
गणेशोत्सव काळात गौरी पूजन (Gauri Pujan) हा एक महत्त्वाचा सण असतो. गौरी अवाहन, गौरी पूजन आणि गौर विसर्जन हे या सणाचे महत्त्वाचे टप्पे. आता सण म्हटलं की शुभेच्छा देणं ओघानेच आले. त्यामुळे तुम्हालाही गौरी पूजन सणानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी इथे असलेले HD Wallpapers, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status आपण वापरु शकता. ज्यामुळे गौरी पूजन सणाचा आनंद कदाचित आपण अधिक लोकांसोबत द्विगुणीत करु शकता.
संस्कृत शब्दकोशात 'गौरी' या शब्दाचा अर्थ दिला आहे. संस्कृत शब्दकोशानुसार आठ वर्षांची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. यासोबच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल असेही काही अर्थ शब्दकोशात सापडतात.





दरम्यान, हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात येणाऱ्या शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते. गौरी अवाहन झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस असतो. या दिवशी गौरीचे पूजन करतात. गौरी म्हणजे महालक्ष्मीचा अवतार मानला जातो. या दिवशी महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. ज्येष्ठा नक्षत्रावर आगमन होत असल्याने काही लोक ज्येष्ठा गौरी असेही नामाभिदान वापरतात.