Gauri Laxmi Decoration 2024

Gauri Laxmi Decoration 2024: बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल.मंगळवारी, (10 सप्टेंबर) रोजी गौरीचं आवाहन आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केलं जाणार असून गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.  काही ठिकाणी बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते. काही ठिकाणी उभ्या लक्ष्मी  पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन, तसेच माहेरवाशीणदेखील म्हटले जाते. दरम्यान, गौराई आगमनासाठी विशेष पूजा केली जाते, गौराईच्या आगमनासाठी विशेष तयारीही केली जाते, संपूर्ण घर सुंदर सजावटीच्या गोष्टींनी सजवले जाते, गौराईसाठी काही हटके सजावट थीम शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही गौराईसाठी आकर्षक सजावट करू शकता. हे देखील वाचा:  Gauri Saree Draping: गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत (Watch Videos)

गौराईसाठी करता येतील असे हटके सजावट थीम व्हिडीओ:

गौराईसाठी करता येतील असे हटके सजावट थीम व्हिडीओ:

गौराईसाठी करता येतील असे हटके सजावट थीम व्हिडीओ:

गौराईसाठी करता येतील असे हटके सजावट थीम व्हिडीओ:

वर दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही गौराईसाठी हटके थीमने डेकोरेशन करू शकता. गौरी, गणपतीचा उत्सव राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती उत्सवात गौराईसाठी विशेष पूजा केली जाते. अनेक प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात.