Ganpati | Representational image (Photo Credits: pxhere)

Ganpati Mehndi Design 2024: गणेश चतुर्थी ज्याला  गणेश उत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा एक अत्यंत महत्वाचा हिंदू सण आहे, जो भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो. या काळात संकटमोचन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाची पूजा केली जाते. हा 10 दिवसांचा सण जगभरातील, विशेषतः भारतात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो.  दरम्यान, घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि तात्पुरत्या सार्वजनिक व्यासपीठांवर गणपतीच्या मातीच्या मूर्ती स्थापित केल्या जातात ज्याला पंडाल म्हणतात आणि नंतर विविध विधी आणि समारंभांद्वारे त्यांची पूजा केली जाते. या खास प्रसंगी महिला गणरायाच्या आगमनासाठी तयारी करतात. घर सुंदर सजवले जाते. दारात रांगोळी काढली जाते, महिला छान शृंगार करतात. विशेष म्हणजे या खास दिवसासाठी हातावर छान मेहेंदी लावली जाते. दरम्यान, तुम्ही पण गणेशोत्सवासाठी किंवा गौरी आगमनासाठी हटके मेहेंदी डिझाईन शोधत असाल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत. व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर सुंदर मेहेंदी काढू शकता. चला तर पाहूया  हे देखील वाचा: Navratri 2024: नवरात्रीची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या, नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या कोणत्या रुपाची पूजा केली जाते

गणेशोत्सव किंवा गौरी आगमनासाठी काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन 

गजानन, धुम्रकेतू, एकदंत, वक्रतुंडा आणि सिद्धी विनायक अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भगवान गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यदेवता म्हणून पूजा केली जाते. हा सण भाद्रपदाच्या हिंदू महिन्याच्या चौथ्या दिवशी (चतुर्थी) सुरू होतो, जो सहसा ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान येतो.