तब्बल दोन वर्षानंतर राज्यात गणेशोत्सव(Ganeshotsav) निर्बंधाविना पार पडणार असल्याची शक्यता आहे. गेले दोन वर्ष कोरोनाचं (Corona) सावट असल्यानं त्याचा मोठा परिणाम गणेशोत्सवावर ही झाला होता पण यावर्षी मात्र राज्यभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात पार पडणार आहे. मुंबई (Mumbai) म्हंटलं की गणेशोत्सवाची पर्वणीचं. पण याच पार्श्वभुमिवर मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासंबंधी काही विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहे. ह्या सुचना घरगुती बाप्पाच्या स्थापनेसंबंधी तसेच सार्वजनिक गणेश मंडळासाठी आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. पण स्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
2023 पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster Of Paris) मूर्त्यांवर बंदी आणण्यात येणार आहे. म्हणजेच शाडूच्या मातीपासून साकारलेली बाप्पाची मूर्ती बंधनकारक असणार आहे. पुढच्या वर्षीपासून बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Muncipal Corporation) क्षेत्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचीचं खरेदी आणि विक्री करणे बंधनकारक असणार आहे. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022 Special Trains: गणेशभक्तांचा प्रवास सुखद होणार, गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून घोषणा)
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे पण ती मूर्ती पीओपीची (POP) असल्याचे नमूद करणे अनिवार्य असणार आहे. जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती ओळखणे सोप होईल. या मूर्त्यांचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता त्यांचे कृत्रीम तलावात (Artificial Ponds) विसर्जन करणे बंधनकारक असणार आहे. तरी मुंबईकरांनी या सर्व नियमांची नोंद घेण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणोशोत्सव अगदी महिना भरावर येऊन ठेपला असताना गणेश भक्तांकडून तसेच प्रशासनाकडूनही बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे.