गणपतीच्या आगमनानंतर वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते. गणेश चतुर्थीपासून देशा-परदेशात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही भाविक मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे. जेव्हा श्रद्धा असते तेव्हा भाषा, प्रांत, धर्म अशा सार्या रेषा पुसट होतात आणि माणुसकीने सारे एकत्र येतात.
आफ्रिकेतही उत्साह
गणेशोत्सव भारतीय परदेशामध्येही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शक्य तितक्या आणि उपलब्ध साधनांचा वापर करत हा सोहळा संपन्न होतो. परदेशात म्हणजेच आफ्रिकेतही यंदा गणेशोत्सवाची धूम दिसली. गणपतीची स्थापना, पूजा उत्साहात झाली मात्र सोबतच त्यांची विसर्जन मिरवणूकही उत्साहात पार पडली
आफ्रिकन वाद्यांनी घेतली ढोल ताशाची जागा
भारतामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघते. मात्र आफ्रिकेमध्या चक्क स्थानिकांनी त्यांची पारंपारिक वाद्य वाजवून गणेश विसर्जनाची मिरवणूक रंगवली. आफ्रिकेत स्थानिकही मराठीत गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष करताना दिसले.
23 सप्टेंबरला विसर्जन
गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. यंदा जगभर 23 सप्टेंबरपर्यंत गणेशभक्त उत्साहात हा सोहळा साजरा करतात. आफ्रिकेप्रमाणेच दुबई, अमेरिका, लंडन, सिंगापूर, थायलंडमध्येही उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.