Ganesh Chaturthi 2024 Invitation Card In Marathi: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्षभरापासून ज्याची वाट पाहात आहोत तो बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे. 5 सप्टेंबर 2024 दिवशी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घरा-घरामध्येही गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. हिंदू धर्मात भगवान गणेशाला ज्ञान, सुख, समृद्धी आणि सौभाग्य देवता मानले जाते. भगवान शिव आणि मातेचा पुत्र गणपती हा पहिला पूज्य देवता आहे आणि त्याला गजानन, बाप्पा, एकदंत आणि वक्रतुंड म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. तुमच्या घरी देखील यंदा गौरी-गणपतीचं आगमन होणार असेल तर त्याच्या दर्शनाचं आमंत्रण तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना द्यायचे असेल तर आम्ही काही खास आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. गणेशोत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिकांचे काही नमूने तुम्ही वापरून नक्कीच तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला गणेशोत्सव सेलिब्रेशन मध्ये सहभागी करून घेऊ शकता. गणरायाच आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी नातेवाईक, प्रियजन, मित्र मंडळींनाआमंत्रित करण्यासाठी खाली दिलेले आमंत्रण पत्रिका फॉर्वर्ड करा. हे देखील वाचा: Pitru Paksha 2024 Start and End Dates: पितृ पक्ष कधी पाहून होणार सुरु? जाणून घ्या, तारीख, महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
गणेशोत्सवात आमंत्रित करण्यासाठी पाठवा खास निमंत्रण पत्रिका, पाहा, काही हटके निमंत्रण पत्रिका
Ganesh Chaturthi 2024 Invitation Card In Marathi
Ganesh Chaturthi 2024 Invitation Card In Marathi
Ganesh Chaturthi 2024 Invitation Card In Marathi
भगवान गणेश संपूर्ण दहा दिवस वास्तव्य करतात आणि भक्त दररोज त्याची पूजा करतात. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सव सुरू होतो. यावेळी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबरला दुपारी ३:०१ वाजता सुरू होऊन शनिवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३७ वाजता संपेल. शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून त्याच दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. हा दहा दिवस चालणारा उत्सव अनंत चतुर्दशीला म्हणजेच मंगळवार 17 सप्टेंबर रोजी संपणार आहे. 7 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11.03 ते 1.34 पर्यंत आहे. अनंत चतुर्दशीला म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.