Ganesh Chaturthi 2022 Eco-Friendly Idols (File Image)

Ganesh Chaturthi 2022 DIY Eco-Friendly Ganesh Idols: गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे. गणेशोत्सव हा 10 दिवसांचा उत्सव आहे. भक्त त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित करतात आणि 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनेक सार्वजनिक ठिकाणीही गणपती बसवले जातात. गणेशोत्सवाच्या 10 दिवसात विविध खेळ घेतले जातात, भक्त वाजत गाजत मूर्ती घरी आणतात आणि 10 दिवसांनंतर नदीत मूर्तीचे विसर्जन करतात. दरम्यान, वाढते प्रदूषण लक्षात घेता, आम्ही गणेशाच्या इको-फ्रेंडली मूर्ती बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. [ हे देखील वाचा: Hartalika Tritiya 2022 Date: हरितालिका तृतीया कधी आहे? हरितालिका तृतीयाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा जाणून घ्या]

कागदापासून बनवा गणेश मूर्ती

गणेश चतुर्थी 2022 जवळ येत असल्याने, लोकांनी उत्सवासाठी गणेशाच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. सण साजरा करत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी इको-फ्रेंडली मूर्ती बनवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, 100% इको-फ्रेंडली गणेश घरी बनवण्यासाठी ट्यूटोरियल पाहा. 

पाहा व्हिडीओ:  

मातीपासून बनवा गणेशमूर्ती

गणपतीची मूर्ती 10 दिवसांनी पाण्यात विसर्जित केली जात असल्याने, पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही. याची काळजी म्हणून इको-फ्रेंडली बाप्पा बनवणे कधीही चांगले आहे.  काही सोप्या ट्यूटोरियल पाहून तुम्ही सर्वोत्तम मूर्ती बनवू शकतात. 

पाहा व्हिडीओ:  

गणेशोत्सवला लोक गणपतीच्या सुंदर मूर्ती घरी आणतात. भगवान गणेशाची पूजा केली जाते, मंत्र म्हंटले जातात आणि उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. उत्सवांमुळे पर्यावरणाचे शोषण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून, उत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यासाठी वर नमूद केलेल्या पद्धती वापरून पहा. सर्वांना गणेश चतुर्थी २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा!