Pandharpur Mandir | Photo Credits: Twitter

आज 22 ऑगस्ट भारतभर आणि अगदी भारताबाहेर देखील गणेश चतुर्थीचा सण आनंदाने साजरा केला जात आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. महाराष्ट्राची शान असलेल्या या सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वांनी मंदाराचा गाभारा सजवण्यात आला आहे. तसंच मंदिरात अष्टविनायकाची रुपं साकारण्यात आली आहेत. दरम्यान कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप मंदिरं दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन भाविकांना ऑनलाईनच घ्यावे लागणार आहे.

आज रुक्मिणी माता हिरव्या रंगाच्या पैठणीत सजली आहे. तर विठ्ठल देवही हिरव्या रंगाच्या धोतर, उपरणांत दिसत आहे. या नव्या साजात विठ्ठल-रुक्मिणीचे रुप अधिकच विलोभनीय दिसत आहे. पंढरपूरच्या विठ्ठ्ल मंदिरात महत्त्वाच्या सणांना फूलांची सजावट करण्याची पद्धत आहे. सध्या मंदिरांत दर्शनासाठी भाविक येत नसले तरी मंदिर समितीकडून ही प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.

पहा फोटोज:

व्हिडिओ:

यंदाचा गणेशोत्सव कोरोना संकटामुळे अगदी साधेपणाने साजरा केला जात आहे. अनेक गणपती मंडळांनी गणेशोत्सव रद्द करुन आरोग्योत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र गणेशोत्सवाची उत्साह, आनंद सर्वत्र कायम आहे. दरम्यान काही नियम पाळणे देखील बंधनकारक आहे.