Ganesh Chaturthi 2020 Makhar Decoration Ideas: गणपती बसवण्यासाठी घरच्या घरी सुरेख मखर कसे बनवाल? (Watch Video)
Representational Image (Photo Credits: Screengrab/ YouTube)

Simple Makhar Decoration Ideas for Ganpati: महाराष्ट्राची शान असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 ऑगस्ट, शनिवार रोजी घरोघरी गणरायाचे आगमन होईल. त्यामुळे घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली असेल. घरात गणरायाला विराजमान होण्यासाठी सुंदर मखर, आरास केली जाते. दरवर्षी या नवीन करायचे याची कल्पना लढवली जाते आणि त्याप्रमाणे सुंदर मखर विकत आणले जातात किंवा घरी केले जातात. मात्र यंदा कोविड-19 च्या संकटामुळे सणाच्या उत्साहावर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेघराच्या घरी सोप्या पद्धतीने मखर बनवण्यासाठी काही खास आयडियाज आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत. त्यामुळे अजूनही तुमची गणपतीची सजावट झाली नसेल तर या आयडिआयज तुमच्या नक्कीच कामी येतील.

गणपतीच्या सजावटीतील महत्त्वाचा भाग म्हणजे मखर. मखराची रचना, रंगसंगती आकर्षक असली तर संपूर्ण आरास सुरेख, लक्षवेधी दिसते. यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी घरच्या घरी तुम्ही सेलिब्रेशनचा आनंद नक्कीच घेऊ शकता. गणपती सजावट, आरास करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. मात्र यंदा लॉकडाऊन आणि अनेक मर्यांदामुळे फुलं पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल असे सांगता येत नाही. त्यामुळे या सजावटीच्या या साध्या, सोप्या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतील. (गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक सजावट, मखर कसा बनवाल?)

पहा व्हिडिओज:

बाजारात मखरांचे वैविध्य पाहायला मिळते. कदाचित कोविड-19 लॉकडाऊनमुळे यंदा दरवर्षीप्रमाणे पुष्कळ पर्याय बाजारात उपलब्ध नसतील. पण त्यामुळे तुम्हाला घराच्या घरी मखर बनण्याचा आनंद मिळेल आणि त्यात बाप्पा विराजमान झाल्यावर तो नक्कीच द्विगुणित होईल.