Ganeshotsav 2019: गणपतीची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या? कशी निवडाल गणेश मूर्ती
Ganpati idol (Photo Credits: Pixabay)

Ganeshotsav  2019: सकळ विद्येची देवता असा लौकीक असलेल्या गणपतीचे आगमन 2 सप्टेंबरपासून होत आहे. गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त आतूर झाले आहेत. 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2019 या काळात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करायचा हे गणेशभक्तांनी केव्हाच ठरवले आहे. पण, आजूनही काही गणेशभक्तांच्या मनात गणपतीच कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत संभ्रम असतो. गणेशमूर्ती ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते. एक डाव्या सोंडेचा गणपती (Left Trunk Ganpati) आणि एक उजव्या सोंडेचा गणपती (Right Trunk Ganpati. आज आम्ही काही माहिती इथे आपल्यासाठी देत आहोत. ज्यामुळे गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्या मनात असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते.

गणपतीच बाप्पांच्या आगमनाचे वेध खरे तर दोन महिने आधिच लागतात. कारण विविध आकारातील, रुपातील गणेश मूर्ती बाजारात यायला सुरुवात होते. यातील काही मूर्ती या डाव्या सोंडेच्या असतात तर, काही मूर्ती उजव्या सोंडेच्या असतात. आता गणेश मूर्तीची सोंड उजव्या बाजूस असावी की डाव्या याबाबत अनेक मतमतांतरे असतात. गणपती मूर्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक डाव्या सोंडेचा गणपती, एक उजव्या बाजूचा गणपती. जाणून घ्या गणपती सोंडेबद्दल काही माहिती.

उजव्या सोंडेचा गणपती

उजव्या सोंडेचा गणपती याचाच अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती. दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा. ही दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची असल्याचे गणपती पुरानाचे अभ्यासक सांगतात. यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपती मध्ये असते. त्याचू सूर्यनाडी सुरु असल्याने तो तेजस्वीही असतो. असे सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप- पुण्याची छाननी केली जाते. त्यामुळे ही बाजू नकोशी असते. महत्त्वाचे म्हणजे दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही. तसेच, या गणपतीची पुजा करताना पूजाविधीचे सर्व नियम काटेकोर पाळले जातील. तसेच, त्यात कोणताही बाधा येणार नाही याकडे कटाक्षाने पाहिले जाते. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती पालीचा बल्लाळेश्वर हे नाव कसे पडले? घ्या जाणून)

गणपती विशेष व्हिडिओ

डाव्या सोंडेचा गणपती

डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. वाम याचाच अर्थ डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डावी बाजू ही उचव्या बाजूच्या विरुद्ध दिशेस येते. डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. ती शीतलता देते. उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते असे मानतात. त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असते. या गणपतीची मात्र नियमीत पूजा केली जाते.

(वरील लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे असा आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारे दावा अथवा अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. वाचकांनी, गणेश भक्तांनी वरील माहिती वाचून कृती करण्यापूर्वी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत सदसदविवेकबुद्धीचा वापर करावा. तसेच, मूर्तीची प्रतिष्ठापणा अगर इतर विचार करण्यापूर्वी तज्ज्ञ आणि अभ्यासकांचा सल्ला जरुर घ्यावा )