Happy Father's Day (Photo Credits: Pexels)

आजचा दिवस हा जगातील सर्व वडीलांचा आहे. फादर्स डे (Father's Day) हा वडीलांसाठी समर्पित केलेला दिवस. आजच्या दिवशी वडीलांना शुभेच्छा तुम्ही द्यालच. पण त्याचबरोबर या खास दिवशी वडीलांना सरप्राईज किंवा सुखद धक्का देण्यासाठी काही खास भन्नाट आयडीयाज (Ideas) तुमच्यासाठी घेऊन आलोय. कोविड-19 निर्बंधांमुळे मोठं सेलिब्रेशन करायला जमणार नाही किंवा ऐन वेळेस काय करावं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या कल्पना तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. (Father’s Day 2021 Images: फादर्स डे निमित्त Messages, Greetings आणि Wallpapers शेअर करुन तुमच्या वडीलांचा दिवस करा खास!)

वडीलांच्या आवडीचा पदार्थ बनवा:

नेहमी आईच्या हाती असलेलं स्वयंपाक घरात आज तुम्हीही प्रवेश करा आणि वडीलांसाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवा. हे तुमचे सरप्राईज त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील.

वडीलांसोबत त्यांच्या आवडीचा सिनेमा, मालिका बघा:

तुम्ही लहानपणी वडीलांसोबत पाहिलेला आणि खूप एन्जॉय केलेला असा एखादा सिनेमा, मालिका आज पुन्हा एकत्र पहा आणि त्याचा मनमुराद आनंद घ्या.

वडीलांना त्यांच्या आवडीच्या गाण्यांची Playlist द्या:

वडीलांना आवडत असलेली जुन्या गाण्यांची playlist त्यांना गिफ्ट करा. कामाच्या दगदगीत स्वत:साठी मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे शांत निवांत गाणी ऐकत ते आपला वेळ आनंदात व्यतीत करु शकतील.

जुन्या फोटोजचे कोलाज:

आजकाल अनेक ऑनलाईन अॅपवर तुम्ही फोटो कोलाज करु शकता. त्यामुळे जुन्या फोटोजचे कोलाज करुन छानसा मेसेज लिहून वडीलांना पाठवा. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मेसेजमुळे वडीलांनाही खास वाटेल.

वडीलांच्या आनंदाखातर एखादी वाईट सवय सोडा:

तुमच्यातील एखादी गोष्ट वडीलांना आवडत नसेल आणि ते वारंवार तुम्हाला त्याबद्दल सांगत असतील. मात्र तुम्हाला ती सोडता येत नसेल. तर आज वडीलांच्या प्रेमाखातर तिचा त्याग करा. सोडून द्या. यातून वडीलांना जो आनंद मिळेल ना तो अमूल्य असेल.

फादर्स डे चा काही प्लॅन नसल्यास वडीलांना आनंदी करण्यासाठी यातील आयडीया तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तर वडीलांसोबत आजचा दिवस व्यतीत करा आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस संस्मरणीय करा.