Father’s Day 2021 Images: फादर्स डे निमित्त  Messages, Greetings आणि Wallpapers शेअर करुन तुमच्या वडीलांचा दिवस करा खास!
Happy Father's Day 2021 | File Image

Father’s Day 2021 Wishes: दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा होतो. आयुष्यात वडीलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे असते. वडील असल्याने घराला आधार, पाठिंबा असतो. वडीलही अगदी अपार कष्ट करुन आपल्या कुटुंबियांना सुखी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. स्वत:ला न मिळालेल्या गोष्टी मुलांना देऊन, त्यांच्या गरजा भागवून, आवडी-निवडी जपून त्यांना वाढवण्याचा अखंड प्रवास वडील करत असतात. याला अपवाद असू शकतात. पण समाजात अशी  बहुतांश उदाहरणे दिसून येतात. आईबद्दल सहज व्यक्त होणारे अनेकजण वडीलांबद्दल मात्र फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. त्यामुळेच फादर्स डे खास आहे. वडीलांप्रती प्रेम, आपुलकी, काळजी, आदर व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' म्हणजे पितृदिन साजरा केला जातो. पाश्चिमात्य असलेली ही संस्कृतीने भारतानेही स्वीकारली आणि आपल्याकडेही फादर्स डे अगदी उत्साहात साजरा होऊ लागला. वडीलांना छानसं गिफ्ट देऊन, शुभेच्छा संदेश पाठवून, केक कापून फादर्स डे सेलिब्रेट केला जातो.

फादर्स डे च्या निमित्ताने वडीलांसोबतच्या नात्यात असलेल्या अनेक भिंती गळून पडल्या आणि आपण त्यांच्याबद्दल व्यक्त होऊ लागलो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे यंदाच्या फादर्स डे निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर वडीलांचा दिवस खास करा. (Happy Father's Day 2021 Quotes: फादर्स डे च्या दिवशी हे Wishes, Greetings, Images, Whatsapp Status पाठवून मित्र परिवाराला शुभेच्छा दया!)

फादर्स डे च्या शुभेच्छा!

Happy Father's Day 2021 | File Image
Happy Father's Day 2021 | File Image
Happy Father's Day 2021 | File Image
Happy Father's Day 2021 | File Image
Happy Father's Day 2021 | File Image

कोविड-19 निर्बंधांमुळे मोठे सेलिब्रेशन शक्य नसले तरी छोटासा संदेशही तुमच्या वडीलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल. त्यामुळे यातील छानसा मेसेज पाठवून वडीलांना म्हणा 'हॅप्पी फादर्स डे!'