
Milad Un Nabi Mubarak: आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. येथे वेगवेगळ्या धर्मांचे, भाषेचे, पंथाचे लोक राहतात. त्यामुळे त्यांचे सण देखील वेगवेगळे असतात आणि ती साजरी करण्याची पद्धत देखील वेगळी असते. यातीलच एक धर्म म्हणजे इस्लाम धर्म. या इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त देशभरात ईद ए मिलाद (Eid-e-Milad un Nabi Mubarak) हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 30 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या मुस्लिम बांधवाना खास मराठी आणि हिंदीतून शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
ते म्हणतात ना सण कोणताही असो पण तुमच्यामध्ये प्रत्येक धर्माचा, त्यांच्या संस्कृती, परंपरांचा आणि सणांचा आदर करण्याची भावना कायम असली पाहिजे. त्यामुळे ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने तुम्ही Facebook, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
एकमेकांस गळाभेट देऊन जपू आपण बांधिलकी
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

आपापसांतील मतभेद सारे विसरून जाऊ
एकमेकांचे सण-उत्सव आनंदाने साजरे करू
ईद मुबारक!

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर आरजू, हर सपना पूरा करें
यहीं दुआ माँगते हैं ईद-ए-मिलाद के इस शुभ अवसर पर
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

ईद लेकर आती है ढेर सारी खूशियां
ईद मिटा देती हैं इन्सान में दूरियां
जरूरतमंदो के लिए हमेशा बढ़ाओ हाथ
जिसका खुदा भी देगा हमेशा साथ!
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

धर्म, भाषेची नाही अडचण हा आहे केवळ भावनेचा प्रश्न
एकत्र येऊन साजरी करु ईद-ए-मिलाद चा जश्न
ईद मिलाद उन-नबी च्या शुभेच्छा

अलीकडे आणि विशेषत: यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा संदेश देण्याला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. लोकांनी घरात राहून आपल्या आप्तलगांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे यंदा कोरोना व्हायरसला देशातून पूर्णपणे घालवून देण्यासाठी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून तुम्ही हे शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि सर्वांना ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा देऊ शकता.