Makar Sankranti 2020 Mehndi Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास मेहंदी डिझाईन्स काढून वाढवा आपल्या हाताचे सौंदर्य!
Makar Sankranti 2020 Mehndi Designs (PC- Instagram)

Makar Sankranti 2020 Mehndi Designs: नववर्षातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्याला 'संक्रांत' म्हटलं जातं. मकर संक्रांतीला काही ठिकाणी 'उत्तरायण' असंही म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी 'तीळ गुळ घ्या, गोड बोला', असा संदेशही दिला जातो.

मकर संक्रातीच्या दिवशी विवाहित महिला खास शृंगार करतात. नवीन साडी परिधान करून देवाची उपासना करतात. या दिवशी महिला आपल्या हातावर मेहंदी काढतात. त्यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. तुम्हालाही यंदाच्या मकर संक्रांतीला आपल्या हाताचं सौंदर्य खुलवायचं असेल, तर खालील मेहंदी डिझाईन्स तुमच्या नक्की उपयोगी येतील. (हेही वाचा - Makar Sankranti 2020 Rangoli Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा !)

View this post on Instagram

 

Mehndi Designs By @noozhat_henna #henna #hennafun #hennaart #hennainspire #hennainspo #hennainspiration #hennainspired #hennadesign #hennadesigns #hennaideas #fingerhenna #handhenna #armhenna #hennalove #mehndi #mehndihenna #mehndidesign #mehendi #mehendidesign #mehendinight #hennatattoos #bridalmehndi #arabicmehndi #stylishmehndidesign #mehandi #mehandidesign #mehndiart #mehndiartist #k4henna

A post shared by Stylish Mehndi Design (@stylishmehndidesign) on

यंदा 15 जानेवारीला म्हणजेच उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो. या दिवशी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत साजरी करण्याची प्रथा आहे.