Rangoli Designs For Raksha Bandhan 2024: हिंदी कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. हा सण भाऊ-बहिणींना समर्पित आहे. इतिहासाच्या पानात रक्षाबंधनाचा उल्लेख अनेक वेळा आला आहे. मात्र, सनातन धर्मात प्राचीन काळापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. आधुनिक काळात भाऊ बहिणीला भेटवस्तू देण्याची प्रथा प्रचलित आहे. यानिमित्ताने घरासमोर रांगोळी काढली जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी लोक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या डिझाइनमध्ये रांगोळी काढतात. तसेच पाटाभोवताली देखील रांगोळी काढली जाते. रक्षाबंधनासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास, सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स (Rangoli Designs For Raksha Bandhan) घेऊन आलो आहोत. तुम्ही या रांगोळी डिझाईन्स काढून तुमचे घर सजवू शकता आणि रक्षाबंधनाचा सण अधिक उत्साहात व प्रसन्न वातावरणात साजरा करू शकता. (हेही वाचा - Mehndi Designs For Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनासाठी हातावर काढा 'या' साध्या, सोप्या आणि काही मिनिटांमध्ये हटके लूक देणाऱ्या मेहंदी डिझाईन्स, पहा व्हिडिओ)
रक्षाबंधनासाठी सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स -
सनातन धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी स्वस्तिक असलेली रांगोळी काढली जाते. हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. सर्व खास प्रसंगी स्वस्तिक रांगोळी काढण्याची परंपरा आहे. कुमकुम, फुले, अक्षत इत्यादी गोष्टींच्या मदतीने तुम्ही स्वस्तिक रांगोळी बनवू शकता. याशिवाय, तुम्ही केवळ फुलांच्या मदतीने स्वस्तिक रांगोळी बनवू शकता. तथापी, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कलश रांगोळी काढू शकता.