
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2023 HD Images: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा आज स्मृतिदिन. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते. हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून पाळला जातो. बाबसाहेब एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकारणी होते. अलौकिक बुद्धिमत्ता व विद्याभ्यासात रममाण असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक नेते म्हणून ओळखले जातात.
बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दलितांच्या, श्रमिकांच्या जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.
तर आजच्या बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत आपणही काही खास Greetings, Wallpapers, HD Images शेअर करत त्यांना अभिवादन करू शकता.






दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काही अनुयायांसह 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत राहिल्या. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. धर्मांतरानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले व मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी तब्बल 12 लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. आजही महापरिनिर्वाण दिनी त्यांचे असंख्य मुंबई शहरात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात.