Babasaheb Ambedkar Videos: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते. तेव्हापासूनच हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' (Mahaparinirvan Din) म्हणून पाळला जातो. यंदा बाबासाहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी, या दिवशी दादर येथील त्यांच्या चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून येतात.
भारतातील दलित समाजाला तसेच अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच बाबासाहेबांनी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध ते नुसते लढलेच नाहीत तर दलित समाजातील प्रत्येकाला त्यांनी मानाने जगण्याची शिकवण दिली.
त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाहूया त्यांचे हे काही दुर्मिळ व्हिडिओ
दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या व बस सेवांच्या वाहतुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तसेच बाबासाहेबांची चैत्यभूमी असलेल्या दादर मधील शिवाजीपार्क विभागात देखील वाहतुकीची व्यवस्था बदलण्यात आली आहे. तसेच, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत ज्यामध्ये 14 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 12 लोकल गाड्यांचा समावेश असणार आहे.