श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी शनिवारी आळंदीतून आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतीलच गांधी वाडा येथे असणार आहे. दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहणार आहे. यासाठी आळंदी, देहू, मोशी परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदा 29 जूनला प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. आषाढी एकादशी यंदा 17 जुलै दिवशी आहे. त्या निमित्त पंढरपुरात मोठा सोहळा होईल. पंढरपुरात 4 दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यावर 21 जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
आळंदी परिसरातील बदल
• चिंबळी ते आळंदी रस्ता बंद राहणार आहे त्यामुळे पर्यायी मार्ग पाहावे.
• वडगाव घेणंद ते आळंदी या मार्गावरील वाहने चाकण-वडगांव घेणंद शेळपिंपळगाव मार्गे कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे जातील.
• मरकळ ते आळंदी या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावरून जातील.
• भारतमाता चौक ते आळंदी या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावरून जातील.
• मोशी-आळंदी या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावरून जातील.
• मोशी-आळंदी या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावरून जातील.
• विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गावरून जातील.
वाहतुकीत करण्यात आलेले बदलमंगळवारी (ता. 25) दुपारी बारा ते रविवारी (ता.30) रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहणार आहे.