
Diwali 2019: सणाच्या निमित्ताने जेव्हा आजूबाजूचा परिसर रंगात, प्रकाशात उजळून निघतो तेव्हा आपल्याही आयुष्यात नवे चैतन्य येते. उत्साह, आनंद आणि चैतन्य या तिघांचा मेळ साधणारा सण म्हणजेच दिवाळीला यंदा 25 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. रोषणाईच्या या सणात काही गोष्टींना खास महत्व असते, त्यातील एक म्हणजे दारासमोर काढली जाणारी रांगोळी (Rangoli) यंदाच्या वेळापत्रकानुसार, उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मीपूजनाचा (Lakshmi Pujan) मुहूर्त आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारस (Vasubaras) सणाने होत असली तरी आज अभ्यंगस्नान केल्यावर खऱ्या सेलिब्रेशनला सुरुवात होते. याच निमित्ताने आज आपल्या दारात आकर्षक रांगोळी काढून तुम्हीही दिवाळीचं स्वागत करायला हवं. नाही काळजी करु नका. यंदा तुम्हाला फक्त रांगोळी काढण्याची मेहनत घ्याची आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी डिझाईन्सच्या कल्पना घेऊन आलो आहोत..
चला तर मग पाहुयात काही सोप्प्या पण सुंदर 'संस्कार भारती (Sanskar Bharti)' रांगोळ्या..
रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून यातुन येणाऱ्या लहरींनी सकारत्मक वातावरण निर्माण होते अशी ही मान्यता आहे, यामुळे दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये आकर्षक रांगोळी विसरून चालणार नाही. यापूर्वी घरे मोठी असल्याने रांगोळीसाठी मोठी जागा मिळत होती मात्र आता जागेच्या अभावी कॉम्पॅक्ट रांगोळीला प्राधान्य दिले जाते यासाठी वर दिलेल्या रांगोळ्यांचे पर्याय एक उत्तम गाईड ठरतील. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.