Padwa Gift (Photo Credits: PixaBay)

Diwali Padwa Gifts Ideas 2022: साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे बलिप्रतिपदा ज्याला आपण पाडवा असेही म्हणतो. पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य असते. तसेच सुवासिनींकडून पतीला औक्षण देखील पाडव्याच्या दिवशी केले जाते. लक्ष्मी ने पती विष्णूला बळीराजाच्या बाबतीत केलेल्या सत्कृत्यामुळे खूश होऊन औक्षण केले होते. त्यावेळी विष्णूने ओवाळणीत सोने, हिरे यांचे अलंकार ओवाळणी म्हणून दिले होते. म्हणूनच पाडव्याला ब-याच विवाहित महिला पतीला ओवाळते. त्या बदल्यात त्यांचे पतीदेव ओवाळणीत काही दाग-दागिना किंवा इतर भेटवस्तू देतात अशी प्रथा आहे. मात्र सध्या बदलत्या काळानुसार पत्नींच्या मागण्याही बदलल्या असतील असं म्हणायला हरकत नाही. त्यात बाजारात दागदागिन्यांसह अन्य बरेच गॅजेट्सही देखील आले आहेत. म्हणून बायकोला ओवाळणीत देता येईल अशा 5 भन्नाट गिफ्ट आयडियाज आम्ही घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया 

1) दागिने (Jewellery)

दागिना हा स्त्री चा आवडीचा असा अलंकार आहे. मग तो खरा असो किंवा खोटा. सध्याच्या फास्ट लाईफमध्ये ब-याच स्त्रिया इमिटेशन ज्वेलरी ला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही ती सुद्धा देऊ शकतात.

2) सौंदर्यप्रसाधने (Cosmetics) 

महिलांना सौंदर्यप्रसाधने प्रिय असतात. अशावेळी बाजारात मिळणारे ब्रँडेड किंवा तुमच्या बजेटमधील सौंदर्यप्रसाधने तुम्ही तुमच्या पत्नीस गिफ्ट म्हणून देऊ शकता.

3) साड्या/ड्रेसेसः (Sarees/Dresses) 

महिलांकडे साड्या आणि कपडे कितीही असले तरी सुद्धा ते कमीच असतात. त्यामुळे तुम्ही छान साडी किंवा ड्रेस भेट म्हणून दिली तरी ते महिलांना आवडते.

4) गॅजेट्स: (Gadgets)

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार महिलांनाही या आधुनिक तंत्रांचे वेडं लागले आहे. यात मोबाईल्स, ब्लूटुथ,  कारवा, घड्याळ  अशा ब-याच गॅजेट्सचा समावेश आहे. तसेच तुमची पत्नी जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्यांना स्मार्टबँड देऊ शकता.

5] डिनर डेट

धावपळीच्या जीवनात एकमेकांसाठी जास्त वेळ काढता येत नाही अशा वेळी तुम्ही तुमचा वेळ दिला तर तुमची पत्नी नक्कीच खूप खुश होणार यात काही प्रश्न नाही.