
दिवाळीचं सेलिब्रेशन जसं आकाशकंदील, पणत्या, फटाके, रोषणाई यांच्याशिवाय अपूर्ण आहे तसेच ते रंगबेरंगी रांगोळ्यांशिवायही अपूर्णचं आहे. पूर्वीच्या काळी नियमित घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढण्याची पद्धत होते. मात्र आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि लहान होत जाणार्या फ्लॅट सिस्टिममुळे कठीण होत चालले आहे. पण किमान सणासमारंभांपुरता रांगोळी नक्कीच काढली जाऊ शकते. दिवाळीच्या दिवसात भरगच्च आणि मोठ्या रांगोळ्यांचा गालिचा घातला जातो. मग तुम्हांलाही रांगोळी काढण्याची हौस असेल तर काही अॅप्स मदत करू शकतील
ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते अगदी मुक्त छंद, फुला-पानांचा समावेश असलेल्या आणि संस्कारभारतीच्या रांगोळ्या दिवाळीच्या दिवसात घराघरात दिसतात. मग तुम्हांलाही यंदा प्रत्येक दिवशी दाराच्या उंबर्यात रांगोळी काढायची असेल तर या काही अॅप्सच्या मदतीने तुमचे प्रयत्न सुकर होतील. काही अॅप्समध्ये फोटो तर काहींमध्ये ट्युटोरिअल्स आणि स्टेप बाय स्टेप रांगोळी कशी काढायची याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
दिवाळी रांगोळ्यांसाठी कोणती अॅप्स करतील मदत ?




तुम्ही डिझाईननुसार त्याच्यामध्ये रंग भरू शकता. तुमच्या आवडीनुसार रांगोळीमध्ये बदल करू शकता. काही अॅप्समध्ये रांगोळी कशी काढायची याचा व्हिडिओ असल्याने तुम्हांला अगदीच स्टेप बाय स्टेप रांगोळी कशी काढायची याची आयडीया मिळेल. Diwali 2018 : दिवाळी स्पेशल 5 सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स