Diwali 2019: धनतेरसच्या दिवशी 'या’ वस्तूंची खरेदी करणं ठरतं शुभ
धनत्रयोदशी किंवा धनतेरस Photo Credits : Facebook

Diwali 2019: दिवाळी अगोदर येणाऱ्या धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसाचे विशेष महत्त्व असते. यादिवशी चांगल्या आरोग्यासाठी ‘धन्वंतरी’ची या आरोग्यरक्षक देवतेची पूजा केली जाते. घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैसा नांदत रहावा म्हणून विशेष प्रार्थनाही तसेच लक्ष्मीची पुजाही केली जाते. धनतेरसच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं शुभ समजलं जातं. या खास लेखातून जाणून घ्या या शुभ वस्तूंविषयी.  (Dhanteras 2019: धनतेरसच्या दिवशी भरपूर करा शॉपिंग पण 'या' गोष्टी चुकूनही घरी आणू नका )

गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती -

गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ संकेत आहेत. या दिवशी गणेश किंवा लक्ष्मीची मूर्ती आणून त्यांची पूजा केल्यास वर्षभर घरात धन आणि अन्नाची कमी भासत नाही.

धातुच्या वस्तू अथवा सोनं-चांदीची खरेदी –

धनत्रयोदशी दिवशी धातुच्या वस्तू अथवा सोनं-चांदीची खरेदी केल्यास भाग्य उजळते. धातुची भांडी तसेच सोन्या-चांदीचे दागीने खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभ मुहूर्त आहे.

झाडू -

झाडू हे लक्ष्मीचे प्रतिक समजले जाते. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचीदेखील पूजा करण्याची प्रथा आहे. यामुळे घरात लक्ष्मी प्रसन्न राहते. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं.

शंख -

शंख सुख समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार धनतेरस आणि लक्ष्मीपूजन या दिवशी शंखनाद करणं शुभ आहे. यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी पसरते. सोबतच घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न व्हावी याकरितादेखील शंखनाद केला जातो.

कवडी -

घरातील तिजोरीत कवडी ठेवल्यास कधीच धनाची कमी भासत नाही. यासाठी धनत्रयोदशी दिवशी कवडी खरेदी करून त्याची पूजा करावी.

कोथिंबीर -

कोथिंबीरीला येणारे धने हे धनाचे प्रतिक आहे. त्यामुळे या दिवशी कोथिंबीरीची पूजा करतात. या दिवशी कोथिंबीर खरेदी करणं शुभ मानलं जातं.

धनतेसरच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. पंरतु, या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं अशुभ मानले जाते. यामध्ये लोखंडाच्या वस्तू, काळ्या रंगाची कोणतेही वस्तू , काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळा. ही दीपावली तुम्हाला सुख, समृद्धी आणि मंगलमय जावो. तुम्हाला आणि  तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.