Dhanteras 2022 (File Image)

Dhanteras 2022 Things to Buy & Avoid For Good Luck: धनतेरस, किंवा धनत्रयोदशी, हा प्रमुख हिंदू सण आहे जो भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक, दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी या मुख्य सणापासून होते. पंचांगमधील अश्विन महिन्यात धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीला, संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाणारी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात  सुख, संपत्ती, समृद्धी नांदते. हिंदू कॅलेंडरच्या तारखांनुसार, धनतेरस यंदा रविवार, 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी हा सण महत्त्वाचा काळ आहे कारण धनत्रयोदशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी धनत्रयोदशीला चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि भांडी खरेदी करतात. पण जर तुम्ही फक्त सोन्याच्या खरेदीसाठी बाजारात जात असाल काही हरकत नाही परंतु धनत्रयोदशीला नको असलेल्या गोष्टी तुम्ही खरेदी करणार नाही याची काळजी घ्या. [हे देखील वाचा : Dhanteras 2022 Date: धनत्रयोदशी कधी आहे? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या ]

धनत्रयोदशीला नक्की घरी घेऊन या, खाली दिलेल्या गोष्टी 

1. पितळ: शुभ मुहूर्त लक्षात घेऊन तुम्ही सणाच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करू शकता. शिवाय, काही लोक देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पितळाची मूर्ती किंवा नाणी देखील खरेदी करतात.

2 .भांडी: कोणतीही भांडी खरेदी करताना चांदी किंवा पितळाची भांडी खरेदी करा.

3. फर्निचर: मुख्यतः सणासुदीच्या वेळी नवीन फर्निचर आणि घरांचे नूतनीकरण करण्यासाठी इतर वस्तू खरेदी करतात.

4.  इलेक्ट्रॉनिक मशिन्स आणि गॅझेट्स: टेलिव्हिजन, लॅपटॉप, फ्रीज आणि मायक्रोवेव्ह यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करणे हे काही पर्याय आहेत जे लोक धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे पसंत करतात.

धनत्रयोदशीला चुकुनही करू नका या गोष्टी खरेदी

 

1 .तीक्ष्ण वस्तू: धनत्रयोदशीच्या काळात, लोक सामान्यतः चाकू, पिन आणि कात्री यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करत नाहीत.

2 .काळ्या रंगाच्या वस्तू: काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका, कारण लोक रंगाचा दुर्दैवाशी संबंध जोडतात.

3 .अॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिक: तुम्ही अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकपासून बनलेली उत्पादने आणि उपकरणे शक्यतो खरेदी करू नका.

शिवाय, दिवाळीच्या पाच दिवसांत भेसळयुक्त खाद्यपदार्थ खरेदी न करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. श्रद्धेनुसार, सणाच्या काळात चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजे.