
बौद्ध धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din). तारखेनुसार बौद्ध धर्मिय हा धम्मचक्र प्रर्वतन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करतात. यंदा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजनांना देण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेल्या या मराठमोळ्या शुभेच्छापत्रांना शेअर करत करू शकता. Wishes, Images, Greetings, Photos शेअर करून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या दिवसाचं स्मरण ठेवत अनेक बौद्ध धर्मीय नागपूरला दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

समस्त बौद्ध धर्मियांना
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला
भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दीक्षाभूमीच्या पायथ्याशी जगण्याचे धैर्य
चला एक मुखाने गाऊ माझ्या भीमाचे शौर्य
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझाच गौतमा प्रकाश पडे अंतरी
तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणूनही ओळखला जातो. नागपूरच्या दीक्षाभूमीप्रमाणे स्थानिक बौद्ध प्रार्थनास्थळांवरही अनुयायींची मोठी गर्दी असते. या दिवशी अनेकजण नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा देखिल घेतात. त्यांच्याकडून बाबासाहेबांप्रति आदरांजली व्यक्त केली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील या निमित्त आयोजन केले जाते.