
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) हा चार महिन्यांचा चातुर्मास देव उठनी एकादशी च्या दिवशी संपतो. चार महिने निद्रावस्थेमध्ये असलेले भगवान विष्णू जागे होतात आणि पुन्हा चराचरात शुभकार्य, मंगलकार्य, लग्नविधींना सुरूवात केली जाते. त्यामुळे कार्तिकी अर्थात देव उठनी (Dev Uthani Ekadashi) एकादशी हा दिवस महत्त्वाचा आहे. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, कार्तिकी एकादशी अर्थात देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. मग या मंगलपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या परिवारातील आप्तांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना देऊन त्यांचाही आजचा दिवस खास करा. देवउठनी एकादशी च्या शुभेच्छा देण्यासाठी खालील Messages, Wishes, HD Images, Greetings, WhatsApp Status शेअर करून तुम्ही कार्तिकी एकादशीचा सोहळा डिजिटली साजरा करू शकता.
महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदायाची वारीची मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी एकादशी च्या निमितानेही काही वारकरी पायी चालत पंढरपूरात विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला येतात. यानिमित्ताने पंढरपूर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. मग तो आनंद तुम्ही पंढरपूरात जाऊन घेऊ शकत नसलात तरीही सोशल मीडीयात विठू भक्तांना शुभेच्छा देऊ शकता.
देव उठनी एकादशीच्या शुभेच्छा





देव उठनी एकादशी पासून पुन्हा मंगलकार्यांना सुरूवात होते. एकादशी नंतर प्रथम तुळशीची लग्न लावली जातात आणि नंतर लग्नराई सुरू होते. त्यामुळे लग्नाळू लोकांना तुळशीच्या लग्नानंतर आपली लग्नकार्य उरकण्याचा, स्थळं पाहण्याचा कार्यक्रम करता येतो.