
Dev Diwali & Kartik Purnima Marathi Wishes: हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभरात येणाऱ्या सणांना विशेष महत्त्व आहे. कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीला 'त्रिपुरारी पौर्णिमा' (Tripurari Purnima) म्हणून संबोधले जाते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) असेही म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी (Dev Diwali) हा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळी ही केवळ पाच दिवसांची असते, असा गैरसमज अनेकांना असतो. परंतु, दिवाळी ही केवळ 5 दिवसांची नसून ती दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. यंदा १२ नोव्हेंबरला देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेचा सण साजरा होणार आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराला काही खास शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करता येईल. याकरिता ही काही शुभेच्छापत्र Greetings, SMS, Messages, Images, WhatsApp Status आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी उपयोगात येतील.
हेही वाचा - Kartik Purnima 2019 : त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? जाणून घ्या याच दिवशी का साजरी केली जाते 'देवदिवाळी'?
'देव दिवाळी' आणि 'कार्तिक पौर्णिमे'च्या शुभेच्छा -
पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कार्तिक मासात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते. अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दु:ख पाहावले नाही आणि त्यांनी अखेर त्रिपुरासूराचा वध केला.अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो.