सध्या चातुर्मासाचा काळ सुरु आहे. चातुर्मासातील पहिल्या आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे ‘आषाढ अमावास्या’ (Ashadhi Amavasya). या अमावस्येनंतर सात्विक अशा श्रावण (Shravan 2020) महिन्याला सुरुवात होते. आषाढ अमावास्या ही ‘दीप अमावस्या’ (Deep Amavasya) म्हणूनही ओळखली जाते. हिंदू धर्मात दिव्याला फार महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. दिवा हे अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग दाखवतो. म्हणूनच आषाढ अमावस्येला दीव्यांची पूजा करून या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केले जाते. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात व या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात.
या दिव्यांना गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात व ते प्रज्वलित करतात. यंदा 19 जुलै 2020 रोजी उत्तर रात्रौ 12 वाजून 10 मिनिटांनी अमावस्या सुरु होत आहे. 20 जुलै रोजी अमावस्या संपल्यावर 21 जुलैपासून श्रावण मासारंभ होत आहे. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने हिला सोमवती अमावस्याही म्हणतात. तर अशा या दीप पूजेचा शुभेच्छा तुम्ही SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून देऊ शकता.
दीप पूजेच्या मनापासून शुभेच्छा!
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
दीप पूजेच्या शुभेच्छा!
दीप पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!
दीपान्वित अमावस्येच्या शुभेच्छा!
दरम्यान, घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्ज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे. ‘दीप’ म्हणजेच दिवा जो अग्नीचा स्रोत आहे. त्यातील तेल म्हणजे मनुष्याच्या अंतर्मनातील वाईट विचार, वाईट सवयी, दुर्गुण यांचे प्रतीक आहे. दीप पूजे दिवशी आपण आत्मरुपी कापसाची वात जाळून आपल्या मनातील आणि आजूबाजूचा अंधःकार जाळून टाकतो, हेच या दिवसाचे महत्त्व.