Dahi Handi 2020 Wishes: श्रावण म्हटलं की सणांची नुसती रेलचेल असते. गोकुळाष्टमी असाच एक उत्साहवर्धक सण, विशेषतः तरुण वर्गात या सणाचा उत्साह भरभरून वाहताना दिसतो. यंदा करोनाचं सावट असल्यामुळे सरकारने सर्व उत्सवावर थोडीफार बंधने घातलेली आहेत. त्यामुळे यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीदोखील साधेपणाने साजरी होणार आहे.
श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) म्हणून साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. हा दहिकालाच म्हणजे दहीहंडी (Dahi Handi) चा उत्सव. यंदा 11 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती असून दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा उत्सव साजरा होणार आहे. दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या मित्र-मैत्रिणींना मराठी Messages, Greetings, Images, WhatsApp Status पाठवून श्रीकृष्णाचा जन्मदिवस नक्की साजरा करा. (हेही वाचा - Janmashtami 2020 Dress Ideas: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लहान मुलांना कृष्ण आणि राधेच्या रुपात कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोप्या टिप्स)
दहीहंडी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा !
दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो,
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
यंदा नक्षत्राची स्थिती पाहून मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव 12 -13 ऑगस्ट रोजी रात्री साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी हा सण भाविकांच्या शिवाय साजरा होणार आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी पांढर्या रंगाच्या पाच पदार्थापासून काला तयार केला जातो. दही, दूध, लोणी, पोहे आदीपासून बनवलेला काला हंडीमध्ये टाकला जातो आणि 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत ही हंडी फोडली जाते.