Ganeshotsav 2020: चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळ यंदा चांदीच्या गणेशमूर्ती ची करणार प्रतिष्ठापना, See Post
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2019 (Photo Credits: Instagram)

Chinchpokli Cha Chintamani: मुंबईतील 101 वर्ष जुने गणेशोत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani) यांनी यंदा कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मोठ्या मूर्तीऐवजी किंवा उत्सवाऐकवजी केवळ परंपरा राखत सण साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार  यंदा मंडळाकंडील चांदीच्या गणेशमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासोबतच उत्सवाच्या निमित्ताने यंदा रक्तदान शिबीर, आरोग्य चिकीत्सा, रुग्णसाहित्य केंद्र, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे उपक्रम राबवण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, यंदा ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळ आयोजित आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम व विसर्जन मिरवणूक सुद्धा रद्द असणार आहे. Ganeshotsav 2020: मुंबई मध्ये लालबागचा राजा मंडळ यंदा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सह आरोग्य उत्सव आयोजित करणार

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी यंदा मंडळ कृत्रिम तलावाची सोय करुन देणार आहे. दरवर्षी उत्सवाच्या दरम्यान होणारा खर्च यंदा मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे तर जवळपासच्या भागात सॅनिटायझेशन करून समाजोपयोगी कामे केली जाणार आहेत.

चिंंचपोकळी चा चिंतामणी Facebook Post 

दरवर्षी मुंबईतील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सोहळा असतो, त्यातही लालबाग मधील गणेशोत्सव हा खास चर्चेत असतो मात्र यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वच मंडळांनी स्वतः आम्ही गणेशोत्सव मोठ्या स्तरावर साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४ फूट पेक्षा अधिक उंच मुर्त्या स्थपित न करण्याचे आवाहन केले आहे ज्याचा सर्व मंडळांनी मान राखण्याचे ठरवले आहे.