
Children's Day Messages in Marathi: 'बालपण देगा देवा...' असं म्हटलंय ते अगदी खरं आहे. लहानपणी ना कशाची भीती ना धास्ती. ना चिंता ना काळजी. फक्त आनंदी जीवन. त्यामुळे बालपण प्रत्येकाला हवंहवस वाटतं. लहान मुलांचे निरागस मन, निख्खळ हास्य पाहिलं की मन आनंदी होतं. याच निरागसतेसाठी एक खास दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे 'बालदिन.' स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस म्हणजचे 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा शनिवार दिवाळी दिवशीच बालदिन आल्याने लहानग्यांच्या आनंदात अधिकच भर पडली आहे. परंतु, बालदिनानिमित्त भेटून शुभेच्छा देणे शक्य नसेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) यावरुन शुभेच्छा संदेश पाठवून तुमच्या ओळखीतल्या लहानग्यांचा दिवस खास करु शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, WhatsApp Stickers, Images आणि शुभेच्छापत्रं!
लहान मुले हेच देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे. योग्य शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, बालदिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी लाडकौतुक आणि गिफ्टचा वर्षाव होत असल्याने बच्चेकंपनी अगदी आनंदात असते. तसंच आजकाल बालदिनानिमित्त सोशल मीडियावर लहानपणीचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. (बालदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील खरं कारण)
बालदिन शुभेच्छा संदेश!
ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,
थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.
असं होतं बालपण,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाखरांची चपळता,
प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता
नि झऱ्याचा खळखळाट
म्हणजे मुले...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच
तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या
लहान बाळाला सुद्धा
बालदिनाच्या खूप शुभेच्छा!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या बालदिनाच्या शुभेच्छा!
सण समारंभ, विशेष दिन यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. बालदिनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपल्या बालमित्रांसोबत शेअर करा.
बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्यातले लहान मुलं सदैव जिवंत ठेवा आणि इतरांनाही त्याच्यातलं बालपण जपण्यास मदत करा. लेटेस्टली मराठी कडून बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!