
मराठा साम्राज्याची स्थापना करणारे थोर शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023). अत्यंत शूर, बुद्धिमान, कर्तव्यदक्ष, दयाळू अशी अनेक बिरुदे मिरवणारे शिवाजी महाराज ही अवघ्या महाराष्ट्राची शान. राज्य कारभार करताना त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि आयुष्यभर पाळलेली नितीमुल्ये आजही आपणास मार्गदर्शक आहेत. महाराजांच्या जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला, तर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध सैन्याच्या तुकड्या आणि सुसंघटित प्रशासकीय कारभाराच्या मदतीने उत्तम स्वराज्य स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात नाविन्यपूर्ण गोष्टी घडवून आणल्या. गनिमी कावा ही युद्धाची नवीन शैली विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त HD Images, Messages, Whatsapp Status शेअर करून राजेंना अभिवादन करा.






(हेही वाचा: Nagpur: नागपुरातील गांधीबाग गार्डनमध्ये एकत्रितपणे हनुमान चालिसाचे पठण, Watch Video)
दरम्यान, शिवाजी महाराज हे भारतातील राष्ट्रीय नायक म्हणून पूज्य आहेत. विशेषतः महाराष्ट्रात ते मराठी अभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक मानले जातात. त्यांचा वारसा भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच त्यांचे जीवन आणि कर्तृत्व अनेक उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साजरे केले जातात.