
Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आज (3 एप्रिल ) 340 वा स्मृतिदिन आहे. रायगडावर 3 एप्रिल 1680 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मुघलांचं आक्रमण थोपवण्यापासून, स्वराज्याची स्थापना करून त्याचा विस्तार केला. जगभरात शिवरायांचा उल्लेख हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, महान द्रष्टा, चारित्र्यसंपन्न महापुरूष आणि प्रजाहितदक्ष राजा असे केले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरण करून त्यांच्या पराक्रमाच्या गाथा पुढच्या पिढीला देणंदेखील गरजेचे आहे. फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेज, स्टेटसच्या माध्यममातून त छत्रपतींच्या स्मृतींना अभिवादन करणारे हे खास मराठमोळे मेसेज, इमेजेस (Images) नक्की शेअर करा. Shivaji Maharaj Death Anniversary: शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारात या '8' व्यक्तींकडे होती महत्त्वाची जबाबदारी!
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी झाला. विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवराय शिताफीने लढले. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या पराक्रमी राजाला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींचं आज स्मरण करायला विसरू नका.
छत्रपती शिवाजी स्मृतिदिन

यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!

ऐसा राजा होणे नाही
छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना
शत शत नमन!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा कारभार त्यांचे सुपुत्र संभाजी महाराजांच्या हातामध्ये आला. शिवरायांप्रमाणेच शंभूराजेंनी देखील राज्याचा कारभार सांभाळला आणि विस्तारला. शिवरायांच्या पश्चात त्यांनी मराठा सम्राज्याचा पसारा वाढवला.