मुंबई: स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din) आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला होता. हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण मानला जातो. आजच्या दिवशी शिवशंभू प्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश आणि प्रतिमा शेअर करून या महान राजाला अभिवादन करत आहेत.
धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेकाचा ऐतिहासिक संदर्भ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यासमोर अनेक संकटे उभी होती. अशा कठीण काळात संभाजी महाराजांनी धैर्याने परिस्थिती हाताळली. 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांना 'छत्रपती' ही पदवी देण्यात आली. या सोहळ्याने स्वराज्याला समर्थ वारसदार मिळाल्याची खात्री रयतेला पटवून दिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज आणि सिद्दी अशा अनेक शत्रूंना सळो की पळो करून सोडले होते.
धर्मवीर संभाजी महाराज शौर्य आणि विद्वत्तेचा संगम
त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी नवीन राजमुद्रा तयार केली, ज्यावर "श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते" हा मजकूर कोरलेला होता.
संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश
संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा स्टेटस




संभाजी महाराज प्रेरणादायी वारसा
संभाजी महाराजांनी आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 120 लढाया केल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत. त्यांचा त्याग आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. दरवर्षी १६ जानेवारीला रायगड किल्ल्यावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा 'शिवशंभू' अनुयायांकडून साजरा केला जातो.