Chhath Puja 2020 HD Greetings: दिवाळीचा महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना! यात धनतेरस, दिवाळी पाडवा, गुजराती नववर्ष यांसारखे अनेक सण असतात. त्याचबरोबर हा दिवाळीनंतर कार्तिक शुक्ल पक्षातील षष्ठीला छठ पर्वाची सुरुवात होते. हा सण देशभरात छठपूजा (Chhath Puja) म्हणून साजरा केला जातो. हा सण बिहारी (Bihari) लोकांसाठी फार विशेष मानला जातो. यंदा हा सण 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यत चालेल. या दरम्यान छठपर्व साजरे केले जाईल. या पर्वात सुरुवातीपासून ते व्रत समाप्ती पर्यंत सूर्य देवतेची आणि छठी मईयाची (Chhathi Maiya) पूजा करून विधिवत उपवास केल्यावर आरोग्य, सौभाग्य, आणि आपत्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी करुन हा सण साजरा करता येणार नाही. मात्र तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून या सणाच्या शुभेच्छा देत या सणाची गोडी वाढवू शकता.
फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, ग्रिटिंग्स, मेसेजेस च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवाराला तसेच मित्रपरिवाराला छठपूजा सणाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामुळे तुम्ही सोशल डिस्टंसिंगचे पालनही करता येईल आणि सणाचा गोडवा देखील टिकवता येईल.
छठपूजेच्या खास HD Greetings:
हेदेखील वाचा- Chhat Puja in Mumbai: मुंबईत छठ पूजेसाठी 'या' ठिकाणांवर BMC कडून बंदी
भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येक धर्माच्या सणांना देखील तितकेच महत्व आहे. सण साजरे करुन आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे हाच या मागचा मुख्य उद्देश असतो. मात्र यंदा तुम्हाला तसे एकत्रित जमता येत नसले तरीही डिजिटल माध्यमाचा वापर करुन तुम्ही एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता.