छठ पूजा (Photo Credits: Wikimedia Commons)

Chhat Puja in Mumbai: देशभरासह राज्यात येत्या 20 तारखेला छठ पूजेचे पर्व पार पडणार आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोनाची परिस्थिती आणि छठ पूजा पाहता काही निर्बंध घालण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिकेने छठ पूजेवर बंदी घातली आहे. तसेच महापालिकेने असे ही म्हटले आहे की, नागरिकांना छठ पूजा ही बीच, नदीच्या तटावर किंवा तळ्यांच्या ठिकाणी करु नये. या ठिकाणी छठ पूजा करण्यावर बंदी असणार आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे.(Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उघडताच दोन हजारांहून अधिक भाविकांनी घेतले श्रीगणेशाचे दर्शन)

कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाच्या छठ पूजेवर त्याचे सावट असल्याने मोठ्या उत्साहने ते पर्व साजरे करता येणार नाही. मात्र नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे असे आवाहन ही आधीपासून करण्यात येत आहे. तर सामुहिक पद्धतीने छठ पूजा करण्यावर सुद्धा बंदी असणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये यावेळी काहीशा प्रमाणात नाराजी असणार हे नक्कीच.(महाराष्ट्रातील धार्मिळ स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली, सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, तुळजाभवानी मंदिरामध्ये 'हे' असतील महत्त्वाचे नियम)

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जवळजवळ आठ महिन्यानंतर मंदिरे, धार्मिक स्थळ सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र त्यावेळी नियम आणि अटींचे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे. त्याचसोबत दिवाळीच्या सणानिमित्त सुद्धा महापालिकेने लक्ष्मी पूजन वगळता अन्य दिवशी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहन ही केले होते. वपस