श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीचा दिवस हा कृष्ण जयंतीचा (Krishna Jayanti) दिवस आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरेला देवकी आणि वासूदेव यांच्या पोटी झाल्याची पुरणकथा सांगते. मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्याने भाविक श्रावण महिन्यातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव (Krishna Janmashtami) रात्री 12 वाजता साजरा करतात. देशभर श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये रात्री 12 च्या सुमारास झुला झुलवला जातो. इस्कॉन मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मोठा सोहळा साजरा केला जातो. मुंबई मध्येही जुहू च्या इस्कॉन मंदिरामध्ये (ISKCON Juhu) खास जन्माष्टमीचा सोहळा असतो.
इस्कॉन मंदिरामध्ये आज 26 ऑगस्ट दिवशी कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अअज दुपारी 3 वाजल्यापासून कलश अभिषेक सुरू होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संध्या आरती, 11.30 वाजता मध्यरात्र महाअभिषेक आणि 1 वाजता महा आरती होणार आहे. आज दुपारी 4.30 पासून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविकांना ऑनलाईन वेबसाईटवरही युट्युबच्या माध्यमातून पाहता येणार आहे. नक्की वाचा: Krishna Janmashtami 2024 Messages in Marathi: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त Greetings, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमय शुभेच्छा!
इस्कॉन मंदिरामध्ये आज श्रीकृष्ण जन्मोत्सव
आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर उद्या गोपाळकाला अर्थात दहीहंडी फोडून सेलिब्रेशन केले जाते. भगवान विष्णू यांचा श्रीकृष्ण हे आठवे अवतार असल्याचं हिंदू धर्मीय मानतात. श्रीकृष्णांच्या लिलांच्या कथा ते त्यांनी रणभूमीवर अर्जुनाला सांगितलेली भगवतगीता या सार्यांचे या सेलिब्रेशन दरम्यान स्मरण केले जाते. अनेक घरांमध्येही कृष्णजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यानिमित्ताने दही,दूधाचा प्रसाद केला जातो.