National Youth Day 2025 Quotes In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

National Youth Day 2025 Quotes In Marathi: स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekananda Jayanti 2025) देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद ((Swami Vivekananda) यांचा जन्म 12 जानेवारी 1963 रोजी कोलकाता येथे झाला. याशिवाय, या दिवशी युवा दिन (National Youth Day 2025) देखील साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. विवेकानंद अगदी लहान वयातच भिक्षू बनले. पाश्चात्य देशांना योग-वेदांताच्या शिकवणीची जाणीव करून देण्याचे श्रेय स्वामीजींना जाते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांनी जागतिक स्तरावर हिंदू धर्माला एक मजबूत ओळख दिली. स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते, ज्यांना नरेन असेही म्हणतात. खूप लहान वयातच त्यांना अध्यात्माची ओढ लागली.

स्वामी विवेकानंद यांचे वडील कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते. त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे संस्कृत आणि फारसी भाषांचे विद्वान होते. वयाच्या 25 व्या वर्षी ते संत झाले. कौटुंबिक वातावरणाने त्याच्या विचारसरणीला आकार देण्यास मदत केली. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा तुम्ही Messages, Images, Greetings कोट्स द्वारे आपल्या प्रियजनांना पाठवू शकता.

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा - 

बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे.

हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात

ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

National Youth Day 2025 Quotes In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

चिंतन करा, चिंता नाही,

नव्या विचारांना जन्म द्या.

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

National Youth Day 2025 Quotes In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा

सर्वोत्तम उपाय म्हणजे

असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा.

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

National Youth Day 2025 Quotes In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही

तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

National Youth Day 2025 Quotes In Marathi 4(फोटो सौजन्य - File Image)

स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा.

लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या.

एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!

National Youth Day 2025 Quotes In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

विवेकानंदांनी त्यांच्या शिष्यांसह रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भूतकाळ आणि भारताच्या वारशाशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे, जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकानंदांचा खूप आधुनिक होता. ते भारताच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळातील एक प्रकारचा पूल होते.