
Shiv Jayanti 2025 Quotes in Marathi: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात शुर, पराक्रमी राजा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. वयाच्या 16 व्या वर्षी, शिवाजी महाराजांनी निष्ठावंत अनुयायांचा एक गट गोळा केला आणि मराठा राज्य स्थापनेसाठी मोहीम सुरू केली. 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला. पुढील काही वर्षांत, त्यांनी गनिमी कावाच्या युक्त्यांचा वापर करून अनेक किल्ले आणि प्रदेश सामरिकदृष्ट्या मिळवले.
दरवर्षी 19 फ्रेबुवारी रोजी त्यांची तारखेप्रमाणे जयंती (Shiv Jayanti 2025) साजरी केली जाते. तसेच अनेक शिवभक्त शिवरायांची तिथीनुसार, जयंती साजरी करतात. यंदा 17 मार्च रोजी तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त तुम्ही Messages, WhatsApp Status, Images, Quotes शेअर करून शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
शिवजंयती कोट्स -
दुश्मन जिथे दिसेल तिथे तलवार वाजली,
अन्याय जिथे झाला तिथे बंड पेटलं!
हीच आहे शिवरायांची शिकवण,
हीच आहे स्वराज्याची शान!
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!
जय भवानी! जय शिवाजी!

न्यायासाठी उचलली जिथे तलवार,
तेथे निर्माण झाले हिंदवी स्वराज्य!
मावळ्यांच्या मनगटात आजही आहे बळ,
छत्रपतींच्या प्रेरणेने चालत राहू पुढे अविरत!
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!

शत्रू जिथे दिसेल तिथे आमची गर्जना,
अन्यायाला संपवण्यासाठी आमची तयारी!
शिवरायांचा वारसा पुढे नेऊ,
स्वराज्याची मशाल अखंड तेवत ठेवू
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!

शिवरायांचे विचार घेऊ,
शौर्य आणि स्वाभिमानाने जगू!
हिंदवी स्वराज्याचा जागर करू!
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!

धन्य ती माता जिजाऊ,
जिने घडवला सिंहपुरुष!
छत्रपती शिवरायांना वंदन!
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!

शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक. हा कार्यक्रम सार्वभौमत्वाची घोषणा आणि मराठा साम्राज्याची औपचारिक स्थापना होती. मोठ्या वैभवाने पार पडलेल्या या राज्याभिषेक समारंभात स्वतंत्र शासक म्हणून त्यांची वैधता सिद्ध करणारे विधी आणि संस्कार करण्यात आले. मुघल वर्चस्वापासून स्वायत्ततेसाठी मराठ्यांच्या आकांक्षेचे प्रतिनिधित्व करणारा एक नयनरम्य सोहळा होता.