Happy Women's Day 2022 Messages: दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा जागतिक उत्सव मानला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांच्या चळवळीचे प्रतीक आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे हा आहे. याशिवाय हा दिवस लैंगिक असमानते विरुद्धच्या जागतिक कारवाईच्या बाजूनेही साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करु शकता.
जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes. Greetings घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करून तुम्ही आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणींना खास शुभेच्छा संदेश देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - International Women’s Day 2022 Wishes: संदेश, Quotes, HD वॉलपेपर सेंड करून साजरा करा जागतिक महिला दिवस)
नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर
सोबत करणाऱ्या “ती”ला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्री म्हणजे एक खडतर वाट….
अश्यक्य ते शक्य करून दाखविणारी
अन्यायाला न्याय मिळवून देणारी
जी बदलेल समाजाची वहिवाट..
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आदिशक्ती तू ,प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू ,मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली तो
मुक्ताईचा ‘ज्ञानोबा’ झाला….
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो
राधेचा ‘शाम’ झाला….
ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो
सितेचा ‘राम’ झाला….
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली
योग्य भुमिका बजावून यशस्वीपणे
आपले कर्तृत्व जगाला दाखवून…
आई,बहीण, पत्नी मुलगी आणि मैत्रीण
अशा विविध रुपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे
उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू
आणि तुच आहेस दुर्गा माता
रोमारोमात तुझ्या भरलीये
ममता आणि कणखरता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जागतिक महिला दिनाची सुरुवात 1908 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथून झाली. या दिवसाची सुरुवात महिला चळवळीमुळे झाली.