Buddha Purnima 2020 Images: बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. यंदा 7 मे 2020 या दिवशी बुद्ध पौर्णिमा भारतासह आशिया खंडात आणि जगभर साजरी केली जाणार आहे.
भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मित्र-मैत्रिणींना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images,WhatsApp Status, च्या माध्यमातून खास शुभेच्छा द्या.
बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.