Blood Moon | Pixabay.com

Blood Moon 2025: होळीला 14 मार्च 2025 रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. या दरम्यान चंद्र खोल लाल रंगाचा दिसेल, ज्यामुळे हे दृश्य खूप खास होईल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि त्याची सावली चंद्राला पूर्णपणे व्यापून टाकते, तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. या काळात सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडत नाही आणि फक्त लाल आणि केशरी किरणचंद्रापर्यंत पोहोचतात. म्हणूनच चंद्र लाल दिसतो, ज्याला ब्लड मून म्हणतात. पण ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे या काळात सूतक काळ लागू होणार नाही.

ब्लड मून कधी आणि किती काळ टिकेल?
चंद्रग्रहणाची वेळ :  13 मार्च 2025  रोजी रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी
चंद्रग्रहणाची वेळ : 14 मार्च 2025 रोजी पहाटे 2  वाजून 26 मिनिटांपासून 3  वाजून 31  मिनिटांपर्यंत
चंद्रग्रहणाचा समारोप : 14 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटे
पूर्ण ग्रहणाचा कालावधी : अंदाजे 65  मिनिटे.
ब्लड मून भारतात दिसणार का?
मात्र, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात हे नेत्रदीपक दृश्य दिसेल.

पुढील पूर्ण चंद्रग्रहण भारतात कधी दिसेल?

भारतात पूर्ण चंद्रग्रहण 7-8 सप्टेंबर 2025 रोजी पाहायला मिळणार आहे.