
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळ्याच्या (Bail Pola) सणाने होते. श्रावण अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) हा सण यंदा 26 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने शेतकर्यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतकरी बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. मग यंदाच्या बैलपोळ्याच्या सणाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, शेतकारी बांधवांना सोशल मीडीयात मेसेजेस, Greetings, GIFs, HD Images यांच्या माध्यमातून देऊन आनंदाने हा दिवस साजरा करा.
बैलापोळा सणाचं औचित्य साधत ग्रामीण भागात घरातील बैलजोडी सजवली जाते. बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना नटवलं जातं. पूजा करून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांना दिवसभरासाठी शेतीच्या कामातून सुट्टी दिली जाते.
बैल पोळ्याचा शुभेच्छा

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या शुभेच्छा

बैल पोळ्याच्या शुभेच्छा

-------------------
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
बैलपोळा सणाच्या शुभेच्छा!

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या शुभेच्छा !

कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा !

बैल पोळा सणाच्या शुभेच्छा
श्रावण हा पावसाळ्यात येणारा मराठी महिना आहे. श्रावणी अमावस्येच्या दरम्यान शेतीची कामं बर्यापैकी संपलेली असतात. त्यामुळे बैलांना या दिवसाच्या निमित्ताने शेतीच्या कामातून सुट्टी दिली जाते. ज्या घरात जिवंत बैल नसतात तेथे मातीचे बैल पुजण्याची पद्धत आहे.