Bail Pola 2022 Messages: श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा 26 ऑगस्ट रोजी आहे. हिंदू धर्मात सजीवावर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणार, वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. शेतकऱ्याचा जवळचा मित्र म्हणजे सर्जा आहे. सर्जा प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. यासुंदर सणाचे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो, शेतात राबणाऱ्या बैलासाठी समर्पित असलेला हा सुंदर सण सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आनंदात साजरा करा.[ हे देखील वाचा: When Is Bail Pola: कधी आहे बैलपोळा? जाणून घ्या सणाची तारीख, महत्व आणि पूजा पद्धत]
पाहा, बैल पोळाचे खास शुभेच्छा संदेश
शेतकऱ्याचा सच्चा मित्र, सवंगडी असणा-या बैलाची पूजा बैल पोळ्याला केली जाते. दिवसरात्र मेहनत करून शेतकरी धान्य पिकवतो आणि या पोशिंद्याचा साथीदार म्हणजे त्याचा बैल नेहमीच शेतकऱ्यासोबत असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो आणि बैला प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.