Rangoli Design for Ashadhi Ekadashi: रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. गावच्या ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोली काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात. खास प्रसंगी आणि सणवाराला आपल्याकडे रांगोळी काढणे पवित्र आणि शुभ मानले जाते.आता काही दिवसांवरच आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या मंगल दिनी दारा समोर रांगोळी काढली जाईल. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत खास आषाढी एकादशी निमित्त दारासमोर किंवा देवघरासमोर काढता येईल आशा सोप्या विठ्ठल रांगोळी डिझाईन्स. (Guru Purnima 2021 Date: यंदा कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून या दिवसाचे महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा विधि)
आषाढी एकादशी विशेष विठ्ठल रांगोळी
सुपरीच्या मदतीने काढलेली रांगोळी
आषाढी एकादशी स्पेशल टिपक्यांची सोपी विठ्ठल रांगोळी
दोन रंग वापरून काढलेली रांगोळी
विष्णू देवतचे व्रत असलेल्या या आषाढी एकादशीला 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासास प्रारंभ होतो. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी चातुर्मास संपन्न होतो.