Ashadhi Ekadashi 2023 Rangoli Designs: रांगोळी हा प्रत्येक शुभ कार्य मधला महत्वाचा भाग मानला जातो. सण असेल किंवा घरात एखादे शुभ कार्य असेल तर दारासमोर रांगोळी काढली जाते. दरम्यान, 29 तारखेला आषाढी एकादशी आहे. दरम्यान, एकादशीनिमित्त कशी रांगोळी काढावी हा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्या साठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. प्रत्येक वारकरी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पहात असतो. आषाढी एकादशीचा दिवस प्रत्येक वारकऱ्यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे आषाढी एकादशीचा दिवस राज्यात उत्साहात साजरा केला जातो. चला तर मग पाहूया रांगोळीचे सुंदर व्हिडीओ
पाहा व्हिडीओ:
आषाढी एकादशीनिमित्त काढा सुंदर रांगोळी, पाहा व्हिडीओ
वर दिलेल्या सुंदर रांगोळी काढून तुम्ही उत्साहाचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता. सण म्हणजे रांगोळी, साफसफाई, पूजा या गोष्टी आल्याच त्यामुळे त्या दिवसाला अधिक महत्व निर्माण होते. या सगळ्या गोष्टी परंपरा जपणाऱ्या आणि सण हा सण वाटावा म्हणून केल्या जातात. त्यामुळे या महत्वाच्या असतात.