Ashadhi Ekadashi 2023: 'चंदनाचा टीळा माथे शोभला, चला चला पंढरीला जावू', असा नामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या नगरीसाठी निघाले आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात विठूच्या नामाचा गजर होत आहे. श्रावण महिन्यातील आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांत येवून आहे. मंगलमय वारीची ओढ सर्वांच लागली आहे याचदरम्यान महाराष्ट्रात आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवसी साजरा करणार येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवानी यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांकडून यंदा बकऱ्यांची कुर्बानी त्या दिवसी दिली जाणार नाही असे वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे.
नक्कीच हा निर्णय हिंदु- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवतो. ह्या निर्णयांने मुस्लिम बांधवांचे कौतुक सर्वीकडे होत आहे. येत्या 29 जूनला एकादशी साजरी केली जाणार आहे. आणि याच दिवशी बकरी ईद देखील साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सद्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिस बांधव सज्ज झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील पोलीसांनी परिसरातील पंढरपुर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात शांतता समितीची बैठक बोलवली होती. त्यावेळी मुस्लिम बांधवाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचे निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवाणी घेतलेल्या ह्या निर्णयाचे जिल्हा भर चर्चा होताना दिसत आहे.