यंदा देशभरात 15 जानेवारी 2023 रोजी 75 वा भारतीय सेना दिन (Army Day 2023) साजरा केला जाईल. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी भारतीय सैन्याचा सन्मान करून, आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले जाते. आपल्या देशाच्या सशस्त्र दलातील प्रत्येक सैनिकाला त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी सन्मानित करण्यासाठी भारतीय सेना दिन साजरा केला जातो.
15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल केएम करियप्पा (Field Marshal KM Cariappa) यांनी ब्रिटीश राजमधील जनरल फ्रान्सिस बुचर (General Sir Francis Butcher) यांच्याकडून भारतीय सैन्याची कमांड आपल्या हाती घेतली होती. जनरल फ्रान्सिस बुचर भारताचा शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ होता. म्हणजेच 15 जानेवारी रोजी फील्ड मार्शल केम करियप्पा हे इंडियन आर्मीचे पहिले कमांडर इन चीफ बनले होते. याच दिवसाची आठवण म्हणून देशात 15 जानेवारी हा सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो.
तर, या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही खास Images, WhatsApp Status, Messages शेअर करून भारतीय जवानांना सलाम करू शकता.
दरम्यान, भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटिशांनी 1 एप्रिल 1895 रोजी केली होती. भारतीय सैन्याचा उगम ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून झाला होता, जे नंतर 'ब्रिटिश इंडियन आर्मी' बनले आणि अखेरीस, स्वातंत्र्यानंतर ‘भारतीय सैन्य’ झाले. भारतीय सेना दिन हा केवळ आपल्या शूर सैनिकांचाच उत्सव नाही तर ब्रिटिश राजवटीतून भारतात सैन्याची सत्ता हस्तांतरित करण्याचाही उत्सव आहे.
दरवर्षी भारतीय सेना दिवस देशभरातील सर्व आर्मी कमांड ऑफिसमध्ये आणि नवी दिल्लीतील मुख्यालयात साजरा केला जातो. मात्र, आता भारतीय लष्कराच्या इतिहासात प्रथमच यंदाचा 75 वा भारतीय सेना दिन बंगळुरू येथे साजरा होणार आहे. आत्तापर्यंत, भारतीय लष्कर दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट कॅन्टमध्ये मुख्य परेडचे आयोजन करण्यात येत होते.