Angarki Chaturthi Special Modak Recipe: अंगारकी चतुर्थी निमित्त उकडीचे लुसलुशीत आणि स्वादिष्ट मोदक बनविण्यासाठी त्यात टाका 'हा' पदार्थ, Watch Video
Modak (Photo Credits: YouTube)

Angarki Chaturthi Special Modak Recipe: गणपतीचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक! त्यामुळे अंगारकी संकष्टी, चतुर्थी, गणेश जयंती काहीही असलेले तरी गणपतीचा नैवेद्य हा उकडीच्या मोदकाशिवाय (Ukdiche Modak) पूर्ण होणारच नाही. गणपतीसाठी वरणभात, भाजी यांसारख्या पंचपक्वानांसह मोदक नैवेद्य म्हणून दाखवणे देखील पूजनीय समजले आहेत. मोदक आणि त्यावर तूपाची धार सोडून गणपतीला हा नैवेद्य दाखवला जातो. मात्र अनेक स्त्रियांना अजूनही छान मोदक बनवता येत नाही. कुणाच पिठच जाड होत, कुणाच सारण बिघडतं, तर कुणाच्या नीट पा-या येत नाही. यांसारखे अनेक समस्या निर्माण होतात.

त्यामुळे उकडीचे मोदक बनवायचे तरी कसे असा मोठा प्रश्न महिलांना पडलेला असतो. लुसलुशीत आणि स्वादिष्ट मोदक बनविण्यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पाहा खाली दिलेला व्हिडिओ. हेदेखील वाचा- Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन श्रीगणेशा पुढे व्हा नतमस्तक!

पाहा व्हिडिओ

काय मग काही लक्षात आलं का! उकडीचे मोदक चवीला जितके चांगले असतात तितकेच ते बनवताना मेहनतही घ्यावी लागते. त्यामुळे वर दिलेला व्हिडिओ पाहून त्याच्या आधारे तुम्ही आज छान उकडीचे मोदक बनवून तुमच्या लाडक्या गणपती बाप्पाला छान 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा.