Anant Chaturdashi 2024 Quotes: सनातन धर्मात अनंत चतुर्दशी सणाला विशेष महत्त्व आहे, कारण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन, विष्णूची पूजा, उपवास आदी कार्यक्रमही केले जातात. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी साजरी होणार असून यासोबतच गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला भाविक पाणावलेल्या डोळ्यांनी गणेशाला निरोप देतात. यासह लोक शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. दरम्यान, या विशेष प्रसंगी, तुम्ही अनंत चतुर्दशीचे हे प्रभावी कोट्स तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना पाठवून हा दिवस साजरा करू शकता. हे देखील वाचा: Shrimant Dagdusheth Ganpati 2024 Visarjan: श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक 'श्री उमांगमलज' रथातून; पहा अनंत चतुर्दशीला कधी निघणार बाप्पा विसर्जनाला
अनंत चतुर्दशीला पाठवता येतील असे खास कोट्स
Anant Chaturdashi 2024 Quotes
Anant Chaturdashi 2024 Quotes
हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि त्यासोबतच दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो, त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला म्हणजेच अनंत चतुर्दशीला या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.