Akshaya Tritiya Images 2024: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र,HD Images, Photos!
Akshay Tritiya | File Images

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) या दिवसाचं हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी दिलेलं दान अक्षय्य असतं असं मानून दान धर्म करण्याची रीत आहे. पाणी, मडकं दान ते अगदी सोनं खरेदी अशा विविध गोष्टी आज केल्या आहे. हिंदूंप्रमाणेच आज वैशाख तृतीया दिवशी जैन बांधव आखा तीज साजरी करतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच सोशल मीडीयात WhatsApp , Facebook, Twitter, Instagram यांच्या माध्यमातून शेअर करू शकता.

भारतामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणामधूनही ही वृत्ती जोपासण्यासाठी आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष आहे. मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने ते अक्षय आणि पुण्यकारक असते. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आज दानधर्म करू शकाल. Akshaya Tritiya Mehendi Design 2024: अक्षय्य तृतीयेला काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ .

शुभ अक्षय्य तृतीया  

Akshay Tritiya | File Images
Akshay Tritiya | File Images
Akshay Tritiya | File Images
Akshay Tritiya | File Images
Akshay Tritiya | File Images

 

महाराष्ट्रात अक्षय्य तृतीयेपासून अनेक शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला सुरूवात करतात. काही जण या साडेतीन मुहूर्ताचं निमित्त साधत सोनं खरेदी करतात. अक्षय्य म्हणजे न संपणारे त्यामुळे या दिवशी तुम्ही दिलेले दान न संपणारे आहे असे समजून अनेकजण पाणी वाटप, अन्नछत्रात अन्न वाटप किंवा समाजपयोगी वस्तूंचं वाटप करून हा दिवस साजरा करतात.